दिराला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Dirala Birthday Wishes In Marathi
दिराला वाढदिवसाच्या शुभेच्छा
दिराला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा : सासू -सासर्यांची तर मनामध्ये प्रचंड भीती असते. अशावेळी आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी, किंवा तिला बोलके करण्यासाठी सासरच्या मंडळींमध्ये एक व्यक्ती अग्रेसर असते ती म्हणजे त्या नववधूच्या नवऱ्याचा भाऊ अर्थात दिर. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दिरासाठी वेगवेगळी नावे वापरली जातात. बहुदा अनेक ठिकाणी दिर या नावानेच या नात्याला संबोधतात. मात्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये दिरासाठी भाऊजी हा देखील शब्द वापरला जातो .तर मराठवाडा विदर्भामध्ये बहिणीच्या नवऱ्याला भाऊजी हा शब्द वापरला जातो. एक सहज आपल्याला माहिती असावे म्हणून सांगितले. अशाच या दीरासाठी आम्ही वाढदिवसाच्या मराठी शुभेच्छा घेऊन आलेलो आहोत.
आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की आज आपण इंटरनेटवरती दिरासाठी मराठी शुभेच्छा शोधत असताना त्या तुम्हाला आमच्याखेरीज कोणत्याच संकेतस्थळावर आढळणार नाहीत.चला तर मग आपल्या नावीन्यपूर्ण अशा लेखाला सुरुवात करूया.
Dirala Vadhdivsachya Hardik Shubhechha
1
जीवनाच्या प्रवासात प्रत्येक
पावलावर तुम्हाला यश मिळो
प्रत्येक यशावर नाव
तुमचेच असावे
संकट किती येवोत तुम्ही कधी
हार ना मानावी
परमेश्वराचे अनंत आशीर्वाद
तुमच्यावर कायमच असावेत
माझ्या लाडक्या दिराला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
2
कुटुंबावर संकट आल्यानंतर
कायम कुटुंबासोबत असणारा.माझा दीर
प्रत्येकालाच भेटत नाही असा दीर
मला भेटला म्हणून मी भाग्यवान आहे
माझ्या लहान दिराला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
3
माझ्या कुटुंबावर एकदा
भले मोठे संकट आले
माझा संसार भरकटू लागला
परंतु माझ्या भरकटलेल्या संसाराला
योग्य दिशा देण्याचे काम
माझ्या मोठ्या दिराने केले
आज आहे त्यांचा वाढदिवस
माझ्या भावासारख्या दिराला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
4
तुम्ही व्हावे शतायुशी
तुम्हाला मिळावे दीर्घायुष्य
कारण तुम्ही आपल्या
कुटुंबासाठी मैलाचा दगड आहात
तुमच्यामुळेच आपल्या कुटुंबाची
भरभराट आहे माझ्या भावासारख्या
लाडक्या दिराला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
मोठ्या दिराला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
5
आज मी परमेश्वराचे
खूप खूप आभार मानते
कारण त्यांनी मला तुमच्यासारखा
समजदार मनमिळावू आणि कायम
आपल्या कुटुंबाच्या पाठीशी राहणारा
दिर दिला आज आहे
तुमचा वाढदिवस तुम्हाल
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
6
माझ्या दिराने माझ्या कुटुंबासाठी
केलेला संघर्ष मी माझ्या
डोळ्याने पाहिला आहे
कुटुंबावरती अनेकदा संकटे आली
परंतु माझ्या जोडीदाराच्या सोबत
संकटामध्ये ठामपणे उभा राहणारा
माझा दीर होता नि आजही आहे
आज आहे माझ्या दिराचा वाढदिवस
त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
7
आज आहे माझ्या
मोठ्या दिरांचा वाढदिवस
तुम्हाला जे हवे ते सर्व मिळावे
तुमच्या मनातील सर्व इच्छा
आकांक्षा पूर्ण होवोत
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
8
माझ्यासाठी दीर नाही
तर भावाप्रमाणे असणाऱ्या
माझ्या छोट्या दिराला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
दिराला बर्थडे विशेष इन मराठी
9
आई तुळजाभवानी आपल्याला
उदंड आणि भरभराटीचे
आयुष्य देवो! हीच प्रार्थना
माझ्या लहान दिराला
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
10
आमच्या कुटुंबाच्या
सुखदुःखांच्या वळणावर
भक्कमपणे आमच्या कुटुंबाला
साथ देणाऱ्या माझ्या लाडक्या
दिराला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
11
माझ्या कुटुंबासाठी माझे दीर
म्हणजे मोठा आधार
आमच्या कुटुंबाच्या प्रगतीचा साक्षीदार
माझ्या छोट्या दिराला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
12
सगळं जग कसं व्यवहारिक बनले आहे
नात्यांमध्ये पण एक प्रकारचा
कोरडेपणा आलेला आहे
असे असले तरी या सर्वांना
अपवाद आहेत माझे मोठे दिर
कारण भाऊ देणार नाही एवढा
आधार त्यांनी आमच्या कुटुंबाला दिला
आज आहे त्यांचा वाढदिवस
माझ्या मोठ्या दिरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
13
घरामध्ये आपल्या नवऱ्यानंतर
आपल्याला समजून घेणारा
आणि आपलासा वाटणारा
आपल्याला भावाप्रमाणे असणारा
म्हणजे नवऱ्याचा भाऊ की
जो आपला नात्याने असतो दीर
आज आहे त्यांचा वाढदिवस
माझ्या लाडक्या दिराला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
लाडक्या दिराला वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
तुमच्यासारखे सुस्वाभावी मला दीर मिळाले
खरोखरच मी भाग्यवान आहे
आज माझी आणि माझ्या कुटुंबाची
जी प्रगती झाली त्यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे
आज आहे तुमचा वाढदिवस
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
15
माझे भाऊजी म्हणजे माझ्यासाठी माझे बंधू जणू आज आहे त्यांचा वाढदिवस भाऊजी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
16
आकाशात हजारो तारे असतील
पण शुक्रतारा एखादाच असतो
अगदी त्याचप्रमाणे जगात
हजारो दीर असतील पण
प्रेमळ आणि कुटुंबाची काळजी
घेणारे तुम्ही एकमेव आहात
माझ्या मोठ्या दिरांना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
लहान दिराला वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
माझ्या नवऱ्याला कायम
मार्गदर्शन करणारे
कधी चुकले नवरोबा
तर त्याला जाब विचारणारे
आणि मला अगदी माझ्याशी सख्ख्या
भावाप्रमाणे नाते जपणारे
माझे मोठे दिर यांना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
18
आज मी परमेश्वराचे
खूप खूप आभार मानते
कारण त्याने मला समजदार
आणि मनमिळावू
दिर दिला ज्यामुळे
मला माझे सासर सासर
कधी वाटलेच नाही
अशा माझ्या भावासमान
असणाऱ्या दिराला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
19
आमच्या कुटुंबासाठी
कायम तत्पर असणारे
अपना पराया कधी भेद न
करणारे माझे मोठे दिर यांचा
आज आहे वाढदिवस
माझ्या अशा प्रेमळ दिराला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
Dirala Birthday Wishes In Marathi
20
या जगात अगदी वेगळे आहेत
माझे दिर आमच्यासाठी
आमच्या मुलांसाठी तर ते
सर्वात प्रिय आहेत
अशा माझ्या छोट्या दिराला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
21
माझ्या आयुष्यातील कठीण प्रवास
ज्यांच्या मार्गदर्शनामुळे सहज
पार पडला असे माझे मोठे दिर
यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
22
घरामध्ये सर्वांची मर्जी सांभाळणारा
सर्वांशी प्रेमाने वागणारा
माझ्या मुलांशी तर बिनधास्त
मस्ती करणारा त्यांच्यावर
उत्तम संस्कार करणारा
त्यांना चांगले वळण लावणारा
माझा लहान दिर आहे
आज आहे माझ्या मं
लहान दिराचा वाढदिवस
माझ्या लाडक्या लहान दिराला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
23
झेप अशी घ्या की
पाहणारे पाहत राहावेत
आकाशाला देखील अशी
गवसनी घाला की सर्वांना
त्याचा हेवा वाटावा
जीवनात इतकी प्रगती करा
की कर्तृत्ववान म्हणून कोणाचे
नाव घेतले जाईल त्यावेळी
तुमचे नाव अग्रस्थानी असेल
अशा माझ्या मेहनती दिराला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
Dirala Birthday Wishes
24
काही माणसे तडकाफडकी
बोलणारे असतात पण
ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी
आपल्या संकटात मात्र ठामपणे
आपली साथ देतात असेच
आहात तुम्ही आज आहे
तुमचा वाढदिवस
माझ्या लाडक्या दिराला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
आपण जन्माला येतो ते एकटे जन्माला येतच नाही मुळी. काही ना काही नाती ही आपल्याला जन्माबरोबरच प्राप्त होत असतात.या नात्यांमुळेच आपण घडत जातो. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. आई वडील आपल्यावरती उत्तम संस्कार करतात. आपल्याला मार्गदर्शन करतात. गुरुजन वर्ग आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवतात.
असेच एक मनातून आपलंसं वाटणार नातं म्हणजे दीर आणि भावजय. ज्यावेळी एखादी नववधू घरामध्ये नवीन असते त्यावेळी आपल्या जोडीदाराशी देखील तिला बोलताना मोकळेपणा वाटत नाही कारण सगळेच तिच्यासाठी नवीन असते.