Birthday Wishes For Grandfather In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजोबा मराठी
Ajoba Birthday Wishes In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजोबा मराठी
Birthday wishes for grandfather in marathi : प्रेम आणि आपुलकीने गोडव्याने भरलेल्या शब्दात वाढदिवसाच्या शुभेच्छा आजोबांना द्यायच्या अनेक मार्ग आहेत, त्यापैकी एक म्हणजे बर्थडे विशेष, संदेश, शायरी, कविता आणि कोट्स. आजोबांच्या वाढदिवशी तुम्ही काही खास नवीन प्लॅन करत असाल तर वाढदिवसाच्या शुभेच्छा, कविता आणि हे खास संदेश त्यात भर घालतील. या अभिनंदन संदेशांसाठी आमच्या वेबसाईटचा हा लेख वाचा. आजोबांच्या वाढदिवसानिमित्त येथे दिलेला कविता आणि इतर अभिनंदन संदेशांचा संग्रह नाविन्य आणि उत्तम आहे.
आई वडील आपल्याला जगण्याचा
मार्ग दाखवत असतात परंतु
आपल्यावरती चांगले संस्कार करण्याचे
काम करणारी व्यक्ती म्हणजे
आपले आजी आजोबा
आजोबा आज आहे तुमचा वाढदिवस
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
2
घरामध्ये गेल्यानंतर आपल्याला
अलगद जवळ घेणारे असतात
आपले लाडके आजोबा
त्यांचा नातू म्हणून मिरवायला
आपल्यालाही सगळीकडे आनंद वाटतो
खरंच मी खूप नशीबवान आहे
की मला तुमच्यासारखे प्रेमळ आजोबा मिळाल
आजोबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
3
कुटुंबामध्ये एकी कशी ठेवायची
सर्वांना कसे समजून घ्यायचे
माणुसकी कशी जपायची
हे मला जर कोणी शिकवले असेल
तर ते आहेत आजोबा तुम्ही
आज आहे तुमचा वाढदिवस
आजोबा तुम्हाला वाढदिवसाच्या
हार्दिक हार्दिक शुभेच्छा !
4
आजोबा आज आपल्या
परिवाराचा वाढलेला पसारा दिसतोय
जीवनामध्ये कुठेही नाही दुःखाचा घसारा
कारण आपण आपले आयुष्य
आम्हा कुटुंबियांसाठी झिजवले आहे
आम्ही आपले खूप खूप ऋणी आहोत
आजोबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
5
जीवनामध्ये आपल्याला चांगली
माणसे मिळणे हे आपले भाग्य असते
आणि आजोबा माझ्यासाठी
तुम्ही ती चांगले व्यक्ती आहात
कारण मी तुमचे अनुकरण करत करतच
लहानाचा मोठा झालो आहे आणि
आज समाजामध्ये जी काही
माझी ओळख आहे ती केवळ तुमच्यामुळे
आजोबा तुमचे हे ऋण मी कधीही
विसरू शकणार नाही आज तुमचा वाढदिवस
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
Happy Birthday Wishes For Grandfather In Marathi
6
लहानपणी आपल्याला अंगा
खांद्यावर खेळवणारे आपण
मोठे झाल्यानंतर हक्काने
आमच्यावर चिडणारे घराण्याची
रीत भात संस्कार जपा म्हणून आग्रह धरणारे
आपल्या कुटुंबाची मान कुठेही
खाली जाऊ नये म्हणून कायम
आग्रही असणारे आजोबा
आजोबा आज आहे तुमचा वाढदिवस
तुम्हाला तुमच्या लाडक्या नातवांकडून
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !
7
आपल्या आयुष्यामध्ये अनेक
लोक आपल्याला भेटतात अनेकांचा प्रभाव आपल्यावरती पडत असतो
परंतु माझ्या लहानपणापासून कायम
माझ्या सोबत असणाऱ्या माझ्या आजोबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
8
आजोबा मी लहान असताना माझी
पहिली मैत्री तुमच्यासोबत झाली
माझा बालमित्र माझा सखा
माझं सर्वकाही तुम्हीच आहात
आज आहे तुमचा वाढदिवस
आजोबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
9
कुटुंबावर संकटे आल्यानंतर
भक्कमपणे उभे राहणारे
सर्वांना आधार देणारे म्हणजे
माझे आजोबा आजोबा तुम्हाला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
10
लहानपणी आई-वडिलांना
त्यांच्या व्यापामुळे आमच्याकडे
लक्ष द्यायला जमले नाही
परंतु त्यावेळी तुम्ही माझ्या
जडणघडणीमध्ये खूप मोलाचे योगदान दिले
आणि आज मी एका उंची वरती
जाऊन पोहोचलेलो आहे
याचे सर्व श्रेय आजोबा तुम्हालाच आहे
आजोबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
Happy Birthday Ajoba In Marathi
11
झाडाला जसा मुळ्यांचा आधार असतो
अगदी त्याच पद्धतीने आजोबा तुम्ही
आपल्या कुटुंबाला अनमोल मार्गदर्शन केले
आपल्या कुटुंबाचा वटवृक्ष बहरवला वाढवला
आज आजोबा तुमचा आहे वाढदिवस
आजोबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
12
आजोबांच्या खांद्यावर बसले की
असे वाटायचे की विमानातून सफर करतोय
कारण ते बालपण खूपच आनंददायी होते
कुठे जायचे म्हटले तरी आजोबा कायमच
नेहमी मला खांद्यावर घ्यायचे
अशा माझ्या लाडक्या आजोबांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा!
13
आजोबा म्हणजे माझ्यासाठी
माझा बालमित्र
माझ्यासाठी माझा सखा
माझ्यासाठी माझे सर्वस्व
अशा माझ्या बालमित्राला म्हणजेच
माझ्या आजोबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
14
आजोबा तुमच्याकडून
घेण्यासारखे खूप काही आहे
घरामध्ये वादाची परिस्थिती असताना
स्थिर राहून कशा पद्धतीने ती
परिस्थिती हाताळायची याचे कौशल्य
तुमच्याकडे आहे भविष्यात मी देखील
याच पद्धतीने शांत डोके ठेवून काम
करण्याचा निर्धार करेन
आजोबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
15
आजोबा तुम्ही लहानपणी
सांगितलेल्या गोष्टी आठवतात
त्या गोष्टीतून शिकलेले बोध
आज जीवनात कामी येतात
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
आजोबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
16
आजोबा आज मी जो काही
प्रगतीपथावर आहे तो केवळ
तुमच्या मार्गदर्शनामुळे आपण
केलेल्या लहानपणीच्या संस्कारांमुळे
आज आहे तुमचा वाढदिवस
तुम्हाला वाढदिवसाच्या तुमच्या
नातवाकडून खूप खूप शुभेच्छा!
17
आजोबा हे कुटुंबासाठी अनुभवाचे
भांडार असतात
कुटुंबाचा आधारस्तंभ असतात
कुटुंबाचे खरे मार्गदर्शक असतात
अशा माझ्या लाडक्या आजोबांना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
18
आजोबा आज आहे तुमचा वाढदिवस
तुमच्या नातवाचे एकच मागणे ईश्वराकडे
माझ्या आजोबांना सुखी संपन्न राहू दे
आयुष्यभर तुमचे आशीर्वाद
मला कायम मिळत राहो
तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
19
घरामध्ये बाबा रागावले
की मला खूप मारायचे
त्या मारापासून मला वाचवणारे
म्हणजे माझे लाडके आजोबा
अशा माझ्या लाडक्या आजोबांना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
20
माझ्या जीवनातील आदर्श
व्यक्ती म्हणजे माझे आजोबा
त्यांच्याकडूनच चांगला माणूस
बनण्याची प्रेरणा घेतली आहे
त्या मार्गावर पुढे देखील जात आहे
आजोबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजोबा मराठी
21
आजोबांचा सर्वांवरच आहे धाक
खेळायला गेल्यावर त्यांनी दिली हाक
तर सुटायचा मला लहानपणी थरकाप
परंतु आज कळत आहे की
त्यांच्या चिडण्यामागे
काय भूमिका होती
खरोखरच आजोबा तुम्ही खूप ग्रेट आहात
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
22
आजचा दिवस आम्हा
कुटुंबीयांसाठी खूपच खास आहे
कारण आज आमच्या सर्वांच्या लाडक्या
आजोबांचा वाढदिवस आहे
हॅपी बर्थडे आजोबा!
23
लहानपणी चिमण्या आणि कावळ्याची
गोष्ट हजार वेळा ऐकली तरी
आम्ही कधी बोर झालोच नाही
कारण माझे आजोबा ती गोष्ट दरवेळी
वेगळ्या पद्धतीने सांगायचे
अशा माझ्या हर हूनरी आजोबांना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजोबा मराठी स्टेटस
24
आजोबा लहानपणी तुम्ही
आम्हाला छान छान गोष्टी सांगितल्या
संसारामध्ये भावी काळात येणाऱ्या
अप्रत्यक्षपणे अडचणी सांगितल्या
आजोबा ईश्वराकडे आज एवढेच मागण
तुम्हाला उत्तम आरोग्य मिळावे
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
25
माझ्या प्रिय आजोबांना त्यांच्या 75 व्या
वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा!
Happy Birthday Ajoba Wishes, Quotes In Marathi
26
आई-वडिलांनी मला जन्म
देण्याचे कर्तव्य केले
परंतु संस्काराने मला उत्तम
बनवण्याचे काम माझ्या
आजोबांनी केले अशा
माझ्या आजोबांना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
27
जीवनामध्ये चांगली माणसे भेटणे
हे आपले भाग्य असते
असेच आहेत माझे आजोबा
आज आहे त्यांचा वाढदिवस
आजोबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
28
घरामध्ये वाद व्हायला वेळ लागत नाही
वेळ लागतो तो संवाद व्हायला
आणि कायमच घरातील व्यक्तींमध्ये
उत्तम संवाद घडवून आणणारे
माझे आजोबा ग्रेट आहेत
आज आहे त्यांचा वाढदिवस
आजोबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
29
प्रेमाचा निर्झर झरा म्हणजे आजोबा
संस्कारांची शिदोरी म्हणजे आजोबा
मानवतेचे उदात्त दर्शन म्हणजे आजोबा
रागाचा उद्रेक म्हणजे माझ्या आजोबा
समाजसेवेचे व्रत जपणारे माझे आजोबा
माझ्या कुटुंबामध्ये समायोजन घडवून
आणणारे माझे आजोबा
कुटुंबाची प्रतिष्ठा जपण्यासाठी तत्पर
असणारे माझे आजोबा
आज आहे त्यांचा वाढदिवस
आजोबा लाडक्या नातुकडून
वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
30
अनुभवाचे गाठोडे म्हणजे माझे आजोबा
संस्कारांची शिदोरी म्हणजे माझे आजोबा
आम्हा सर्वांना शिस्तीचे धडे देणारे माझे आजोबा
आज आहे त्यांचा वाढदिवस
आजोबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
Birthday Wishes For Ajoba In Marathi Language
31
कुटुंबात प्रतेक व्यक्तीकडे काही
ना काही जबाबदाऱ्या असतात
यामध्ये सर्वात महत्त्वाची जबाबदारी
आम्हा लहान मुलांवर संस्कार करण्याची
माझ्या आजोबांनी अतिशय चांगल्या
पद्धतीने पार पाडली आज आम्हाला
त्या संस्कारांचे महत्त्व कळत आहे
अशा माझ्या लाडक्या आजोबांचा
आज आहे वाढदिवस आजोबा
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
32
संकटे आल्यानंतर न घाबरता
त्याला तोंड कसे द्यायचे
हे आजोबा मी तुमच्याकडून शिकलो
आपल्या कुटुंबात देखील अनेक
चढ उतार आले परंतु त्याला न
घाबरता त्याचा सामना करण्याचे
कौशल्य तुमच्याकडे होते
आज माझ्या जीवनात देखील
अशा छोट्या-मोठ्या समस्या आल्या की
मला तुमचा चेहरा आठवतो
आणि त्या समस्या मला समस्याच वाटत नाही
असा अनमोल संदेश देणाऱ्या
माझ्या आजोबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
आजोबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
33
आजोबा तुमचे वय झाले
शरीर थकले परंतु तुम्ही मनाने
अजून तरुण आहात
म्हणूनच तुम्ही आमच्याशी
प्रेमासारख्या विषयावर देखील
मनमोकळेपणाने गप्पा मारता
आम्हाला मार्गदर्शन करता
आमच्या डॅशिंग आजोबांना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
आजोबांच्या वाढदिवसाचे विशेष या पोस्टचे शेवटचे शब्द
आपण या पोस्टचा शेवट पाहू, तुमच्या आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवणे हा तुम्हाला त्याच्यावर किती प्रेम आहे आणि त्यांच्याविषयी किती आपुलकीची भावना आहे हे दाखवण्याचा एक विचारशील आणि चांगला मार्ग आहे. त्यांचे जीवन आणि त्यांनी आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी केलेले अनेक योगदान साजरे करण्याचा हा एक उत्तम मार्ग ठरू शकतो. तुम्ही मनापासून संदेश पाठवण्याची निवड केली असाल तर, एखादा मजेदार तुमच्या बाबतीत घडलेला किस्सा किंवा भेटवस्तू, तुमच्या आजोबांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी देऊन त्यांचा वाढदिवस सेलिब्रेशन करा. म्हणून आमच्या या पोस्ट मधील बर्थडे विशेष जरूर वापरा आणि या वाढदिवसा दिवशी आपले आजोबा आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे दाखवून द्या या विशेष दिवशी आमच्याकडून तुमच्या आजोबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.